डोंबिवली गँगरेप प्रकरण: पीडितेला मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 15:24 IST2021-09-25T15:24:03+5:302021-09-25T15:24:32+5:30
अखेर प्रकृती स्वस्थ असल्याने पिडीत मुलीला डिस्चार्ज देण्यात आला.

डोंबिवली गँगरेप प्रकरण: पीडितेला मिळाला डिस्चार्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण:डोंबिवली मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये 33 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत एकूण 29 जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरीत 4 आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान पीडित तरुणीला शुक्रवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मंगळवारी रात्रीपासून पीडित मुलीवर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वेळोवेळी पोलिसांकडून देण्यात आली होती. अखेर प्रकृती स्वस्थ असल्याने पिडीत मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. मुलीला पोलीस बंदोबस्तही देण्यात आल्याचं समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून उर्वरित आरोपींना कधी अटक केली जाते? ते देखील पहावं लागणार आहे.