कल्याणमध्ये पार पडली जुळी गर्भपाताची अत्यंत किचकट अन् अवघड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 09:55 PM2021-08-09T21:55:15+5:302021-08-09T21:55:30+5:30

मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया काही नविन नाही.

A very complicated and difficult process of twin abortion passed in Kalyan | कल्याणमध्ये पार पडली जुळी गर्भपाताची अत्यंत किचकट अन् अवघड प्रक्रिया

कल्याणमध्ये पार पडली जुळी गर्भपाताची अत्यंत किचकट अन् अवघड प्रक्रिया

Next

कल्याण- कल्याणात काही दिवसांपूर्वी झालेली गर्भपाताची अत्यंत किचकट आणि अवघड प्रक्रिया एका खाजगी रुग्णालयात पार पडली. काही दिवसांपूर्वी 29 वर्षीय गर्भवती महिला उपचारासाठी आली होती. 

सोनोग्राफी तपासणीत संबंधित महिला ही जुळी परंतु दुर्मिळ स्कार एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंट असल्याचे आढळून आले. या अत्यंत दुर्मिळ प्रकारात गर्भपिशवीमध्ये गर्भ न राहता यापूर्वी झालेल्या सिझरिंगच्या जखमेवर/ टाक्यांवर हे गर्भ रुतून बसतात. त्याला वैद्यकीय भाषेत एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसी असे संबोधले जात असल्याची माहिती तज्ञांकडून देण्यात आलीये. या प्रकारात गर्भपात करणे हे संबंधित रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत अवघड असते. कधी कधी अशा प्रकारचे गर्भपात करताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. 

मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया काही नविन नाही. मात्र कल्याणात अशा प्रकारच्या रुग्णावर यशस्वीपणे उपचार करणे ही कल्याणातील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने मोठे आव्हानात्मक होते. वैद्यकीय क्षेत्रात सुमारे 15 ते 20 लाख रुग्णांमध्ये एखादा असा  एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसीचा रुग्ण आढळून येतो. 

Web Title: A very complicated and difficult process of twin abortion passed in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.