डोंबिवलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 22:52 IST2021-06-29T22:49:01+5:302021-06-29T22:52:24+5:30
मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमरास ठाकुर्ली पूर्वेकडील म्हसोबा नगर चोळेगाव येथील बैठ्या चाळीत घरात गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्याची ...

डोंबिवलीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोघे जखमी
मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमरास ठाकुर्ली पूर्वेकडील म्हसोबा नगर चोळेगाव येथील बैठ्या चाळीत घरात गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात वृद्धासह त्याचा मुलगा जखमी झाला आहे. सुदैवाने घरातील बाकी सदस्य वेळीच घराबाहेर पडल्याने त्याच्या जीवितास हानी पोहचली नाही. मात्र घर जळून खाक झाले. आगीत भाजलेल्या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डोंबिवली रामनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली.
प्रकाशचंद कुस्तीमिया ( ७० ) आणि अरविंद कुस्तीमिया ( ३२ ) असे यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अरविंद यांची पत्नी घरात जेवण बनवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र प्रसंगावधान राखत घरातील सदस्यांनी घराबाहेर धावले. मात्र प्रकाशचंद आणि अरविंद हे दोघे घराला लागलेली आग विझविण्यासाठी आत गेले आणि यावेळी त्यांना इजा झाली. चाळीत राहणारे काही रहिवाशांनी आग विझवण्याच्या प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमक दलाने धाव घेतली.