बदलापूर ग्राममधील बारवी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 23:51 IST2023-05-15T23:51:25+5:302023-05-15T23:51:46+5:30

नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना

Two died after drowning in Barvi river in Badlapur village | बदलापूर ग्राममधील बारवी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

बदलापूर ग्राममधील बारवी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

पंकज पाटील, बदलापूर: बदलापूरच्या अस्नोली गावाजवळ बारवी नदीत बुडून रविवारी सायंकाळी दोघांचा मृत्यू झाला आहे. नदीत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली.

बदलापुरात बारवी नदीत पोहण्यासाठी निशिकांत मोरे आणि सिद्धेश सावंत हे दोन तरुण उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानर ते बुडू लागले. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी बदलापूर येथे राहणाऱ्या बाळकृष्ण केदारे या इसमाने नदीत उडी मारली. मात्र त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने तो सुद्धा बुडू लागला.

यात आधी पोहायला गेलेल्या दोन तरुणांपैकी सिद्धेश सावंत (१८) याच्यासह त्याला वाचवायला गेलेला बाळकृष्ण केदारे (३७) या दोघांचा मृत्यू झाला. तर मोरे या तरुणाचा जीव सुदैवानं वाचला. बुडालेल्या दोघांचे मृतदेह स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले असून याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Two died after drowning in Barvi river in Badlapur village