कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या, हल्लेखोर पसार

By मुरलीधर भवार | Updated: September 25, 2023 17:16 IST2023-09-25T17:16:12+5:302023-09-25T17:16:55+5:30

भोलाकुमार महंतो असे हत्या झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

Truck driver killed in Kalyan, attackers ran | कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या, हल्लेखोर पसार

कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या, हल्लेखोर पसार

कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील दुर्गाडी पुलाजवळ ट्रकचा टायर खराब झाल्याने ट्रक बाजूला घेऊन उभा असलेल्या ट्रक चालकाची अज्ञात इसमानी चाकुने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. भोलाकुमार महंतो असे हत्या झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. हत्या करून मारेकरी पसार झालेत. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मारेकऱ््याचा शोध घेत आहेत भोला कुमारची हत्या कोणी आणि का केली ? हे पोलिस तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

ट्रकचालक भोलाकुमार आज पहाटेच्या सुमारास ट्रक घेऊन शहाडच्या दिशेने जात होता . कल्याण दुर्गाडी पुलाजवळ त्याच्या ट्रकच्या टायरमध्ये बिघड झाला. त्यामुळे त्याने ट्रक बाजूला घेतला. तो खाली उतरला. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमानी चाकूने भोसकून त्याची हत्या केली. या घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पसार झालेत. पोलिस हल्लेखारांचा शाेध घेत आहेत.

 

Web Title: Truck driver killed in Kalyan, attackers ran