टोलमुक्ती! कल्याण-शिळ मार्गावरील काटई येथील टोलवसुली अवजड वाहनांसाठीसुद्धा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 03:01 PM2021-03-12T15:01:53+5:302021-03-12T15:08:01+5:30

Toll collection at Katai on Kalyan-Shil road : कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरु असून काटई येथील टोल वसुली बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी पासून होणार प्रवाशांची मुक्तता होणार आहे.

Toll collection at Katai on Kalyan-Shil road is also closed for heavy vehicles | टोलमुक्ती! कल्याण-शिळ मार्गावरील काटई येथील टोलवसुली अवजड वाहनांसाठीसुद्धा बंद

टोलमुक्ती! कल्याण-शिळ मार्गावरील काटई येथील टोलवसुली अवजड वाहनांसाठीसुद्धा बंद

Next
ठळक मुद्देराज्यातील जुना टोल अशी कल्याण-शिळ रोडवर असलेल्या या काटई टोलची ओळख आहेवाहतूक कोंडीमुळे काटई टोल नाका बंद करण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णयसद्यस्थितीत कल्याण – शिळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम उत्तम गतीने सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

डोंबिवली - कल्याण शिळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका असून तो इगल इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीद्वारे चालविण्यात येत होता. यापूर्वी हलक्या वाहनांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली होती, तद्नंतर सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जात होता. परंतु; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे सदर टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी वारंवार करीत होते, त्यास अखेर यश मिळाले आहे.    

सद्यस्थितीत कल्याण – शिळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम उत्तम गतीने सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणे व महामार्गावर जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग असून मध्येच टोलनाक्यावरहि अवजड वाहनांना थांबा मिळत असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येते.
    
निळजे येथील धोकादायक असलेला उड्डाणपूलाची डागडुजी करून तोही अवजड वाहनांना करता खुला करण्यात आला आहे. काटाई येथील टोल बंद करून तेथील टोल बूथ सुद्धा तेथून काढून टाकण्यात यावी जेणेकरून वाहतुकीस अडथला होणार नाही  हि बाब  खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निदर्शनास आणून दिले असता , राज्य शासनाने सदर कल्याण-शिळ रस्त्यावरील काटई टोल नाकाबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  
    
कोनगांव ते शिळ रोड दरम्यान रस्त्याचे काम हि होणार असून काटई टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीपासूनही मुक्तता होणार असल्याने नागरिकांना व प्रवाशांना जलदगतीने प्रवास करणे शक्य होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास हि संपेल अशी माहिती खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारचेहि यावेळेस आभार व्यक्त केले आहे.

Web Title: Toll collection at Katai on Kalyan-Shil road is also closed for heavy vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.