चोरट्याने थेट तिजोरीच नेली उचलून; परिसरात खळबळ, डोंबिवलीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 13:23 IST2021-04-01T13:23:18+5:302021-04-01T13:23:31+5:30

बंगल्यातील ठेवलेली छोटी तिजोरी घेऊन या चोराने पळ काढला.  

The thief picked up Nellie directly from the vault; Excitement in the area, incident in Dombivali | चोरट्याने थेट तिजोरीच नेली उचलून; परिसरात खळबळ, डोंबिवलीतील घटना

चोरट्याने थेट तिजोरीच नेली उचलून; परिसरात खळबळ, डोंबिवलीतील घटना


डोंबिवली: डोंबिवलीतील मिलाफनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झालीये. आता या परीसरातील एका बंगल्यातील तिजोरीच थेट चोर उचलून घेऊन गेला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये  दिसू नये, याकरिता या चोराने  बंगल्यातील DVR मशीनही सोबत नेली . मात्र समोरच्या बंगल्यातील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे.

मिलापनगर एमआयडीसी मधील इंद्रप्रस्थ बंगल्यात राहणारे अनिल मेहता हे आपल्या पत्नीसह अमेरिकेतील मुलाकडे राहण्यास गेले होते. 31 मार्च रोजी पहाटे  सुमारे सव्वा तीन वाजण्याच्या दरम्यात चोरट्याने त्यांच्या  बंगल्यात येऊन खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला.  

बंगल्यातील ठेवलेली छोटी तिजोरी घेऊन या चोराने पळ काढला.  तिजोरी मध्ये 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 25 हजार रोख रक्कम, 50 ग्रॅम वजनाचे चांदीचा ताम्हण दिवा तसेच बँक लॉकर/कारच्या  चाव्या व महत्त्वाची कागदपत्रे होती. सदर वजनदार तिजोरी घेऊन जाण्यासाठी चोरट्याने कुठल्यातरी वाहनांचा वापर केला असण्याचा  प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.  मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The thief picked up Nellie directly from the vault; Excitement in the area, incident in Dombivali