मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही
By अनिकेत घमंडी | Updated: November 24, 2023 16:47 IST2023-11-24T16:46:44+5:302023-11-24T16:47:17+5:30
जलशुध्दीकरण केंद्र येथील विदयुत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे मंगळवारी करण्यात येणार आहेत.

मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही
डोंबिवली: कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या १४४ द.ल.ली. बारावे जलशुध्दीकरण केंद्र, १५० द.ल.ली. नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र व १०० द.ल.ली. मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येथील विदयुत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करणे करिता मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या बारावे, नेतिवली, व मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण (पूर्व व पश्चिम), डोंबिवली (पूर्व व पश्चिम), व कल्याण ग्रामिण विभाग (टिटवाळा, वडवली, आंबिवली , शहाड, अटाळी व कल्याण ग्रामिण विभागातील इतर गावे) या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी सदर परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी केले आहे.