शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक

By मुरलीधर भवार | Updated: June 6, 2024 17:01 IST

या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे.

कल्याण-लोकल ट्रेनने दादरहून ठाण्याला जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला प्रवासात झोप लागली. झोपेमुळे ती थेट कसारा कारशेडला पाेहचली. तिला जाग येताच तिच्या लक्षात आले की, तिच्या जवळचा महागडा आयफोन आणि सोन्याची चैन चोरीला गेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे.ठाण्यात राहणारी तरुणी दादर वरळी येथील एका बड्या हा’टेलमध्ये शेफचे काम करते. तिने तिचे काम आटोपून बुधवारी दुपारी दादर स्थानकातून लोकल ट्रेन पकडली. प्रवासात तिला झोप लागली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिने पाहिले की, कसारा कार शेडमध्ये पोहचली आहे. तिच्या लक्षात आले की, तिच्या जवळचा महागडा आयफोन आणि सोन्याची चैन गायब आहे. तिने कसारा स्थानकातून कल्याणला जाणारी लाेकल पकडली. गाडीत तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एका तरुणाला ताब्यातघेतले होते. ते त्याची चौकशी करीत होती. त्याच्याजवळ महागडा मोबाईल आणि सोन्याची चैन कुठून आली. मात्र तो काही एक माहिती त्यांना सांगत नव्हता. ते त्याला घेऊन कल्याण रेल्वेपोलिस ठाण्यात पोहचले. तेव्हा ज्या तरुणीचा मोबाईल आणि चैन चोरीला गेली होती.ती तरुणी देखील त्याच वेळी तक्रार देण्यास कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाली. तक्रार आणि चोर आमने सामने पोलिस ठाण्यावर आल्यावर चोरट्याचे बिंग फुटले. पोलिसांनी आशिष मकासुरे याला अटक केली आहे. आशिषला हा भांडूपला राहतो. त्याला वडिल नाही. त्याला आई आहे. आई आजारी आहे. आशिष काही तरी काम करुन आईच्या उपचारासाठी पैसे खर्च करतो. त्याला ते पैसे कमी पडतात. आईच्या उपचारासाठी आणखीन पैशाची गरज होती. त्याने तरुणीचा माेबाईल आणि चैन चोरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे करीत आहेत.दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांनी आणखीन एक आरोपीला अटक केली आहे. ज्याचे नाव विशाल प्रसावधान असे आहे. या आरोपीने देखील कल्याण रेल्वे स्थानकातून एका प्रवाशाचा मोबाईल चोरी केला होता. विशाल हा गुजरातला चालला होता. त्याने मोबाईल चोरी का केला ? याचा तपासही कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेPoliceपोलिसThiefचोर