शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमध्ये ‘स्टुडंट कोच’चा प्रस्ताव १४ वर्षांपासून सरकारकडे धूळ खात; मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:47 IST

सोहम कठरे याच्या अपघाती मृत्यूनंतर प्रश्न ऐरणीवर, विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सुरक्षितपणे चढता यावे आणि प्रवास करता यावा, याची जबाबादारी निश्चित करावी

अनिकेत घमंडीडोंबिवली - कसारा, कर्जत, बदलापूर, कल्याण - डोंबिवली आदी शहरातून अनेक विद्यार्थी लोकलने ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे महाविद्यालयात जातात. त्यांना सकाळच्या वेळी गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. परिणामी अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना लोकलच्या एखाद्या डब्यात राखीव आसनव्यवस्थेचा प्रस्ताव २०१२ पासून प्रलंबित आहे. मात्र केंद्र, राज्य शासन त्याचा गांभीर्याने विचार करत नसल्याने मंगळवारी डोंबिवलीच्या सोहम कठरे या बारावीच्या विद्यार्थ्याचा गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाला.

प्रवासी संघटनेची खंत माजी खासदार संजीव नाईक, आनंद परांजपे यांनी २०१२मध्ये यासंदर्भात उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेसमवेत बैठक घेऊन रेल्वे बोर्ड अध्यक्षांशी यासंदर्भात दिल्लीत जाऊन चर्चा केली होती. काळाची गरज लक्षात घेऊन स्टुडंट कोचसंदर्भात विचार केला जाईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रस्ताव धूळ खात पडल्याची खंत वांगणी, कल्याण - डोंबिवली, दिवा, ठाणे भागातील प्रवासी संघटनांनी व्यक्त केली.

मुंबई विभागाचे रेल्वे अधिकारी सामान्य प्रवाशांसाठी किरकोळ सुविधावगळता फार काही करतील, अशी अपेक्षा आता राहिलेली नाही. शासनाने लोकलचे प्रश्न खरेच गांभीर्याने घेतले आणि केंद्रीय स्तरावरून उपनगरी लोकल सेवा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पाव्यतिरिक्त भरीव आर्थिक मदत केली, तर दिलासा मिळेल.  मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था

मुख्यमंत्र्यांना पत्रमेट्रोप्रमाणे सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत. विद्यार्थी राखीव डब्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस तैनात करावेत तसेच परीक्षेच्या वेळेत प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा आणि रेल्वे कर्मचारी तैनात करावेत. विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सुरक्षितपणे चढता यावे आणि प्रवास करता यावा, याची जबाबादारी निश्चित करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनेता आणि सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी अथर्व वगळ याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Student coach proposal gathers dust for 14 years; demand ignored.

Web Summary : A student coach proposal, pending since 2012, remains unaddressed. Commuters highlight the need for student-reserved compartments and improved safety measures, especially after a recent accident. Students request automatic doors, police presence, and enhanced security during exams.
टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल