वाडेघरमधील तलाव सहा महिन्यांपासून बंद; म्हात्रे क्रीडा संकुलातील तलावाला निवडणूक काळात टाळे

By सचिन सागरे | Updated: April 7, 2026 13:20 IST2026-04-07T13:17:47+5:302026-04-07T13:20:12+5:30

महापालिका हद्दीत खासगी इमारत व बड्या गृहसंकुलात तरण तलाव आहेत.

The pond in Wadeghar has been closed for six months; the pond in Mhatre Sports Complex will be closed during the election period | वाडेघरमधील तलाव सहा महिन्यांपासून बंद; म्हात्रे क्रीडा संकुलातील तलावाला निवडणूक काळात टाळे

वाडेघरमधील तलाव सहा महिन्यांपासून बंद; म्हात्रे क्रीडा संकुलातील तलावाला निवडणूक काळात टाळे

सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेने खासगी कंत्राटदाराला बीओटी तत्त्वावर कल्याण स्पोर्ट विकसित करण्यासाठी दिले होते. खासगी कंत्राटदाराने त्यात जलतरण तलाव सुरू केला. मात्र, हा जलतरण तलाव तयार झाल्यापासून आतापर्यंत वादाच्या भोवऱ्यात सापडला असून गेल्या ६ महिन्यांपासून बंद आहे.

महापालिका हद्दीत खासगी इमारत व बड्या गृहसंकुलात तरण तलाव आहेत. तेथे केवळ सोसायटी सदस्य व बड्या गृहसंकुलातील सदनिकाधारकांना लाभ घेण्याची सुविधा आहे. अन्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. महापालिकेने बीओटी तत्त्वावर खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून तलाव उभारला. मात्र, कंत्राटदारावर महापालिकेचे नियंत्रण नाही. या गलथान कारभाराचा फटका जलतरणपटूंना बसत आहे.

वर्षाला ३ हजार रुपये शुल्क

खासगी तरण तलावाचा लाभ घेण्याकरिता एका तासाकरिता १०० ते ५०० रुपये दर आकारले जातात. हे शुल्क तेथे कशा प्रकारे सोयी-सुविधा पुरविल्या जातात. महापालिकेच्या वाडेघर येथील तरण तलावात वर्षाला ३ हजार रुपये शुल्क आकारले जाते.

डोंबिवलीतील तलाव ठरतोय आधार

डोंबिवलीतील हभप सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव ‘केडीएमसी’च्या अखत्यारीत आहे. येथे केवळ ३० रुपये शुल्क असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी हा तलाव महत्त्वाचा आधार ठरतो. अडीच ते दहा फुटांपर्यंत खोली, जीवरक्षक, प्रशिक्षक आणि सुरक्षारक्षक, अशी व्यवस्था येथे आहे. या क्रीडा संकुलाचा वापर अनेकदा निवडणुकांच्या काळात प्रशासकीय कामांसाठी केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव त्या काळात तलाव बंद असतो. त्यामुळे, नियमित सराव करणाऱ्या जलतरणपटूंना पर्याय नसल्याने त्यांचा सराव खंडित होतो. यापूर्वी याविरोधात जलतरणपटूंनी आंदोलन केले होते.

Web Title : वाडेघर टैंक बंद; चुनाव के दौरान म्हात्रे पूल बंद होने से तैराकों को परेशानी।

Web Summary : वाडेघर स्विमिंग पूल छह महीने से बंद है। चुनाव के दौरान म्हात्रे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का पूल बंद होने से तैराकों का अभ्यास बाधित होता है। निजी पूल महंगे हैं, जबकि डोंबिवली पूल किफायती है लेकिन बंद होने का सामना करना पड़ता है। इससे उभरते एथलीट प्रभावित होते हैं।

Web Title : Wadeghar Tank Closed; Mhatre Pool Shut During Elections Disrupting Swimmers.

Web Summary : The Wadeghar swimming pool has been closed for six months. The Mhatre sports complex pool shuts during elections, disrupting swimmers' practice. Private pools are costly, while the Dombivli pool is affordable but faces closures. This impacts aspiring athletes.

टॅग्स :Swimmingपोहणे