महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

By अनिकेत घमंडी | Updated: September 10, 2022 18:05 IST2022-09-10T18:05:05+5:302022-09-10T18:05:48+5:30

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले.

The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations | महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

डोंबिवली: घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी महापालिकेने ठिकठिकाणी विसर्जन घाटावर निर्माल्य व्यवस्थापनाकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यातून विसर्जन स्थळी एकूण १७१ टन निर्माल्य जमा झाले. ते निर्माल्य डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान, एमआयडीसी येथील खत प्रकल्प,आयरे बायोगॅस प्रकल्प, कचोरे बायोगॅस प्रकल्प, उंबर्डे बायोगॅस प्रकल्प येथे देण्यात आले.

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. अशाप्रकारे निर्माल्य खाडी, नदी या मध्ये न टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात घट झालेली आहे. यास नागरिकांचा व श्री गणेश मंडळांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेने विसर्जन स्थळांवर फायर ब्रिगेड, स्वयंसेवक, रबरबोट इत्यादी साहित्य सज्ज ठेवले होते त्याचप्रमाणे विसर्जन स्थळे व विसर्जन मार्गावर १६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व २४५५ हॅलोजनची व्यवस्था करण्यात आली होती. श्री गणेशोत्सवादरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे एकूण ६७ जनरेटर, ८८ लाइटिंग टॉवर विद्युत विभागामार्फत बसविण्यात आले होते. त्यामुळे निर्माल्य संकलन करण्यास सहकार्य झाल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.

Web Title: The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.