मोलकरणीने लांबवली दोन लाखांची रोकड
By सचिन सागरे | Updated: March 17, 2024 17:22 IST2024-03-17T17:21:16+5:302024-03-17T17:22:34+5:30
अक्षय यांना कपाटात पैसे ठेवताना घरकाम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले होते.

मोलकरणीने लांबवली दोन लाखांची रोकड
कल्याण : घरमालकाची नजर चुकवून एका ३४ वर्षीय मोलकरणीने कपाटातील दोन लाख रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय तेली (२८, रा. कल्याण) यांनी २ मार्च रोजी कामानिमित्त आणलेले दोन लाख रुपये घरातील कपाटात ठेवले होते. अक्षय यांना कपाटात पैसे ठेवताना घरकाम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले होते. त्यानंतर, संधी मिळताच मोलकरणीने कपाटाला लावलेल्या चावीच्या सहाय्याने ड्रॉव्हर खोलून त्यातील दोन लाख रुपये लंपास केले. कपाटात पैसे नसल्याचे निदर्शनास आल्यावर अक्षय यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पूनम परदेशी विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण वाघ करत आहेत.