स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर कोसळण्याचा मार्गावर

By अनिकेत घमंडी | Updated: May 14, 2024 13:18 IST2024-05-14T13:18:21+5:302024-05-14T13:18:45+5:30

केडीएमसी प्रशासनाने त्वरित यावर कार्यवाही करून भविष्यात दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेणे जरुरी आहे.

Street light pole on the verge of collapsing on the road | स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर कोसळण्याचा मार्गावर

स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर कोसळण्याचा मार्गावर

डोंबिवली : येथील एमआयडीसी निवासी मधील मिलापनगर आरएल २३ बंगल्यासमोर स्ट्रीट लाईट हा तिरपा झाला असून कोसळण्याचा मार्गावर आहे. नु

कतेच काही महिन्यांपूर्वी हे नवीन स्ट्रीट लाईट पोल बसविण्यात आले होते. ते स्ट्रीट लाईट पोल बाबत तक्रार केडीएमसीकडे करण्यात आली असून हा पोल पडू नये म्हणून स्थानिक रहिवाशांनी सद्या या पोल भोवती मातीने भरलेल्या गोण्या लाऊन त्याला आधार देण्याच्या प्रयत्न केला आहे. जर हा पोल अचानक कोसळला तर दुर्घटना होऊ शकते. विशेष म्हणजे या नवीन पोलचे काँक्रिट बांधकाम वर्षभरात कसे काय निकामी झाले ? शिवाय इतर ठिकाणचे लावलेले सर्व नवीन पोल यांचीही पाहणी करणे आता आवश्यक आहे. केडीएमसी प्रशासनाने त्वरित यावर कार्यवाही करून भविष्यात दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेणे जरुरी आहे.

Web Title: Street light pole on the verge of collapsing on the road