खराब रस्त्यांच्या विरोधात भाजपकडून रास्ता रोको

By मुरलीधर भवार | Updated: October 3, 2022 14:49 IST2022-10-03T14:48:55+5:302022-10-03T14:49:22+5:30

कल्याण-रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात भाजपकडून कल्याणच्या बल्याणी परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop road from BJP against bad roads | खराब रस्त्यांच्या विरोधात भाजपकडून रास्ता रोको

खराब रस्त्यांच्या विरोधात भाजपकडून रास्ता रोको

कल्याण-रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात भाजपकडून कल्याणच्या बल्याणी परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याचे काम सुरु करु या लेखी आश्वासनानंतर भाजप कार्यकत्र्यानी आंदोलन मागे घेतले. टिटवाळा परिसरात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आत्ता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ते खराब झाले आहे. त्यामुळे नागरीकांसह वाहन चालकांना त्रस सहन करावा लागतो. कल्याण नजीक बल्याणी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दुर्गा माता मंदीरापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालकांना खडडय़ातून वाट काढावी लागते. अनेकदा तक्रार करुन देखील महापालिकेकडून दखल घेण्यात आलेली नाही.

अखेर आज भाजप मोहने मंडळाकडून भाजप पदाधिकारी मुन्ना रईस आणि शक्तीवान भोईर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात भाजप कार्यकत्र्यासह नागरीक आणि वाहन चालक सहभागी झाले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन दिले गेले. हा रस्ता पंधरा दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरु होणार त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आत्ता तरी प्रशासन जागे होणार की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Stop road from BJP against bad roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण