महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी आठही पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करणार

By मुरलीधर भवार | Updated: January 1, 2025 20:52 IST2025-01-01T20:52:23+5:302025-01-01T20:52:43+5:30

सध्या आठही पोलिस ठाण्याकरीता प्रत्येकी एक दामिनी पथक कार्यरत आहे.

Special cells to be set up in all eight police stations for crimes against women | महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी आठही पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करणार

महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी आठही पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करणार

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेच्या पश्चात कल्याण डाेंबिवलीतील आठही पोसिस स्टेशनमध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांकरीता विशेष कक्ष सुरु करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे. सध्या आठही पोलिस ठाण्याकरीता प्रत्येकी एक दामिनी पथक कार्यरत आहे.

उपायुक्त झेंडे यांनी सांगितले की, २०२४ साली १८ वर्षाखाली मुलींवरील बलात्काराचे ६५ गुन्हे दाखले झाले. ते सगळेउघडकीस आले आहेत. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण १०० टक्के आहे. १८ वर्षावरील महिलांवर झालेल्या बलात्काराच्या गुन्हयांची संख्या ५८ आहे. हे सगळे गुन्हे उघड झालेले आहेत. १८ वर्षाखालील मुलींचे विनयभंगाचे गुन्हे ७२ घडले आहे. त्यापैकी ७० गुन्हे उघडकीस आले आहेत. १८ वर्षावरील गुन्हयांचे १६३ घडले आहे. त्यापैकी १५६ उघडकीस आले आहेत. १८ वर्षाखालील मुलींच्या अपहरणाचे गुन्हे १५४ घडले. त्यापैकी १४३ गुन्हे उघड झाले. १८ वर्षापेक्षा जास्त महिलांच्या अपहरणाचे २ गुन्हे घडले. २ ही गुन्हे उघडकीस आले आहेत.

खूनाचे गुन्हे २१ घडले. खून्याच्या प्रयत्नाचे ३२ गुन्हे घडले. दरोड्याचे २ गुन्हे घडले. या तिन्ही प्रकारातील गुन्हे १०० टक्के उघडकीस आले आहेत. भाग एक ते पाच या प्रकरातील ३ हजार ४४ गुन्हे दाखळ झाले. त्यापैकी २ हजार ३७१ गुन्हे उघडकीस आले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत या गुन्ह्यांच्या प्रकारात ४९ गुन्हयांची घट झाली आहे. दारुबंदीचे ४८७ गुन्हे दाखल झाले. सगळे उघडकीस आले आहेत. २२ लाख ४५ हजार रुयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे अंमली पदार्थाचे ३६ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यात ५१ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तीन बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. १९ जणांची अग्नीशस्त्रे जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याचबरोबर १३३ चाकू सुरे धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

घरफाेडीचे १९८ गुन्हे दाखल होते. त्यापैकी १२३ गु्न्हे उघड झाले. संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पाच प्रस्ताव तयार केले. त्याअंतर्गत २७ आरोपींच्या विराेधात कारवाई केली. हद्दपारीच्या ७९ प्रस्तावांतर्गत ८७ आरोपींच्या विरोधात कारवाई केली आहे. यावर्षी चोरीस गेलेला १ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तो रेसिंग डेच्या निमित्ताने फिर्यादींना परत केला जाणार आहे. मागच्या वर्षी १ कोटी ३२ लाखाचा मुद्देमाल नागरीकांना परत करण्यात आला होता.

Web Title: Special cells to be set up in all eight police stations for crimes against women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.