शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:53 IST

हर्ष हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील संतोष हे पाणीपुरी विक्रीची हातगाडी लावतात. उच्च शिक्षण घेण्याचे हर्षचे स्वप्न होते.

मुरलीधर भवार

कल्याण : अभ्यासासाठी भाड्याने घेतलेली  दहा बाय दहाची खोली. त्यात पुरेसा प्रकाश नाही. पावसात घरात पाणी घरात साचू नये याकरिता ठिकठिकाणी लावलेले प्लास्टिक. खोलीत पुस्तकांचा, सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचा पसारा अशा कठीण परिस्थितीवर मात करीत कल्याणच्या पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाने ‘आयआयटी’पर्यंत मजल मारली. हर्ष संतोष गुप्ता याची उत्तराखंडातील रुरकी आयआयटीत निवड झाली. 

हर्ष हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतो. त्याचे वडील संतोष हे पाणीपुरी विक्रीची हातगाडी लावतात. उच्च शिक्षण घेण्याचे हर्षचे स्वप्न होते. कोरोनात लॉकडाऊन असताना ११ वी परीक्षेत तो नापास झाला. त्याची प्रकृतीही साथ देत नव्हती. त्याने जिद्द सोडली नाही. त्याने पुन्हा ११ वीची परीक्षा दिली. १२ वीनंतर त्याने जेईई मेन्समध्ये ९८.५९ टक्के गुण मिळविले. त्याची जेईई ॲडव्हान्सला निवड झाली; पण त्याने प्रवेश घेतला नाही. त्याला देशातील सर्वोत्तम कॉलेजात प्रवेश घ्यायचा होता. त्याने राजस्थान येथील मोशन एज्युकेशन कोटा येथून अभ्यास केला. त्याची उत्तराखंडातील रुरकी येथील आयआयटीमध्ये निवड झाली. त्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भविष्य घडवायचे आहे.

मुलाच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न डोळ्यासमोर

हर्षचे वडील पाणीपुरी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जमवलेल्या पुंजीतून त्यांनी मुलाच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले.

पाणीपुरीवाल्याचा मुलगा काय आयआयटीत प्रवेश घेणार? अशा शब्दात हर्षला त्याच्या वर्गातील मुले चिडवायची. त्याने आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित केले. आता तीच मुले हर्षचे अभिनंदन करीत आहे.

हर्षला त्याचे ध्येय गाठण्यात त्याचे शिक्षक नितीन विजय यांनी मार्गदर्शन केले. हर्षने १० ते १२ तास अभ्यास केला. कोचिंग आणि सेल्फ स्टडीवर भर दिला. त्यामुळे त्याला हे यश मिळाले.  हर्षची आई गावी असते. हर्ष त्याचे वडील, दोन भाऊ आणि आजी सत्यभामा यांच्यासाेबत राहतो, असे त्यांच्या पालकांनी सांगितले.

दहा बाय दहाची खोली

हर्षची आई गावी असते. हर्ष त्याचे वडील, दोन भाऊ आणि आजी सत्यभामा यांच्यासाेबत राहतो. त्याने अभ्यासासाठी एकांत मिळावा, याकरिता दहा बाय दहाची खोली भाड्याने घेतली आहे. त्यात त्याने अभ्यास केला आहे.

मी पाणीपुरी विक्रेता असलाे तरी मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावू शकतो. पाणीपुरी विक्रीतून मिळणारे उत्पन्न फारसे नाही. तरी माझी जमापुंजी मोडून हर्षच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. हर्षची आयआयटीत निवड झाली त्याचा आनंद खूप आहे. हर्ष सोबत मला माझी दोन मुले शुभम आणि शिवम

यांना देखील उच्च शिक्षण देऊन मोठे करायचे आहे.

संताेष गुप्ता, हर्षचे वडील