कल्याणामधील रिक्षाचालकांचा सामाजिक भान; पोलीस, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मोफत रिक्षा सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 14:20 IST2021-05-06T14:20:05+5:302021-05-06T14:20:28+5:30
हसन सैयद, फारुख शेख, इरफान शेख आणि युनूस शेख अशी या रिक्षा चालकांची नावे आहेत.

कल्याणामधील रिक्षाचालकांचा सामाजिक भान; पोलीस, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मोफत रिक्षा सेवा
कल्याण: कोरोना संकटामुळे रिक्षाचालक देखील आर्थिक अडचणी त सापडले आहेत. मात्र स्वतः संकटात असूनही कल्याणात काही रिक्षाचालकांनी सामाजिक बांधिलकी जपलीये. कल्याणातील चार रिक्षाचालकांनी एकत्र येत आपत्कालीन सेवेतील पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी, डॉक्टर यांना मोफत रिक्षा सेवा सुरू केलीये. हसन सैयद, फारुख शेख, इरफान शेख आणि युनूस शेख अशी या रिक्षा चालकांची नावे आहेत.
कोरोना काळात आपत्कालीन सेवेतील कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपणही सामाजिक भान जपत आपल्यापरीने समाजसेवा करावी या उद्देशाने हे रिक्षाचालक मोफत सेवा देत आहेत. रूग्णांना देखील मोफत रुग्णालयापर्यंत पोहचवण्याची महत्वाची जबाबदारी रिक्षाचालक निभावतायेत. आपल्या रिक्षा च्या मागे त्यांनी आपला मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करत आपत्कालीन कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.