शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज ठाकरेंना धक्का; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Updated: February 1, 2021 20:45 IST

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडले आहे.

कल्याणकल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांनाच आपले करुन एक महत्वाची राजकीय खेळी खेळत मनसेची हवा निवडणूकीपूर्वीच गुल केली आहे. या घटनेमुळे मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मनसेचे कदम यांच्यासह मनसे विद्यार्थी संघटनेचे सागर जेधे, कल्याण तालुकाध्यक्ष अजरुन पाटील, दीपक भोसले आदी कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कदम हे पूर्वी शिवसेनेत होते. मनसेची स्थापना झाली त्यादिवपासून ते संस्थापक सदस्य होते. 2009 साली त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. 

विविध कल्पक आंदोलने करुन महापालिकेतील शिवसेना भाजप युतीला कायम जाब विचारून धारेवर धरणारे अशी कदम यांची प्रतिमा आहे. मनसेचा सच्च कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने मनसेचाच मोहरा हिरावून घेतला आहे. शिवसेनेच्या विरोधात असलेल्या कदम यांना आपले करण्याची किमया शिंदे पिता-पुत्रंनी साधली आाहे. त्यांच्या किमयेमुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

प्रवेशादरम्यान कदम म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारे संयमित नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे आहे. त्याचबरोबर विरोधात असताना कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम पाहिले. त्यांनी पत्री पूलाचे काम मार्गी लावत असताना मेहनत घेतली आहे. तसेच खासदार म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. आता आगामी काळात पक्षप्रमुख आणि पक्ष जी जबाबदारी देईल, ती चोख पाडेन, असंही कदम यांनी सांगितलं. तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवशे केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला वाटतं राजेश कदम जे बोलले ते पुरेसं आहे. त्यांचं सर्वांचं पक्षात स्वागत आहे. शिवसेनेची ताकद ही कल्याण- डोंबिवलीमध्ये आहेच. ती आता अधिक वाढते आहे. राज्यातील अनेक ठिकाणी देखील शिवसेनेत अनेकजण प्रवेश करत आहे. त्यांच्या ज्या अपेक्षा आहे, त्या पूर्ण करण्यासाठी पक्षाकडून वाव दिला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं

दरम्यान, प्रवेशासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दोनच दिवसापूर्वी या सगळ्यांना घेऊन पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे गेलो होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त नाही. अचानक त्यांनी आज शिवसेनेत केलेला प्रवेश हा अनाकलनीय आहे, असं राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याण