शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड महामार्गावर शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्रांनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:25 IST

कल्याणमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime: ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून गुन्हेगारीने टोक गाठल्याचे चित्र आहे. मतदारांवर दबाव आणण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी थेट जीवघेणे हल्ले होत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या भावावर प्रचार करू नको म्हणून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच कल्याण तालुक्यातील मुरबाड महामार्गाजवळ एका राजकीय पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

कल्याण तालुक्यातील मुरबाड महामार्गावरील मामणोली गावाजवळ शुक्रवारी संध्याकाळी किरण घोरड या राजकीय पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून टोळक्याने राडा घालत घोरड यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. वाद चिघळल्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यात आले.गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ अतिरिक्त कुमक तैनात केली असून संशयितांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत. या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, घोरड यांच्या अलीकडील हालचाली आणि संपर्कातील व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे.

अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या भावावर जीवघेणा हल्ला

मुरबाडच्या घटनेपूर्वी बुधवारी, अंबरनाथ पश्चिम भागात भाजप उमेदवाराच्या भावावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सत्यम सुनील तेलंगे (२२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ प्रजेश तेलंगे हे भाजपच्या तिकिटावर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक लढवत आहेत. हल्ल्यातील मुख्य आरोपी साहिल वडनेरे याने सत्यमला बोलावून भाजपाचा प्रचार करायचा नाही, केल्यास ठार मारेल, अशी धमकी दिली. यानंतर त्याने अचानक धारदार शस्त्राने सत्यमवर वार करून त्याला गंभीर जखमी केले.

याप्रकरणी साहिल वडनेरे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी साहिल वडनेरेला अटक केली असून, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिस