मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचा आला फोन; पदाधिकाऱ्याच्या किस्स्याने शिवसैनिक भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 21:22 IST2022-07-14T21:21:55+5:302022-07-14T21:22:31+5:30

शिवसेनेचे कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांनी कल्याणमध्ये आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केले आहे. विजय साळवी यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सर्व शिवसैनिक भावूक झाले.

Shiv Sena office bearer Vijay Salvi told a story at a Shiv Sena rally held in Kalyan. | मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचा आला फोन; पदाधिकाऱ्याच्या किस्स्याने शिवसैनिक भावूक

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच एकनाथ शिंदेंचा आला फोन; पदाधिकाऱ्याच्या किस्स्याने शिवसैनिक भावूक

कल्याण- मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत बसलो असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला. हे कळताच उद्धव ठाकरे दुसऱ्या खोलीत निघून गेले. परत येऊन हे पण विचारले नाही एकनाथ शिंदे काय बोलत होते. म्हणजे आमचा साहेब किती सोज्वळ आहे. हे विधान शिवसेनेचे कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांनी कल्याणमध्ये आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केले आहे. विजय साळवी यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सर्व शिवसैनिक भावूक झाले.

कल्याण डोंबिवलीत गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेना भाजपची सत्ता आहे. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ ठाण्यातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहे. तरी देखील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. शिवसैनिकांनी पुन्हा तिच उभारी देण्यासाठी पक्षाने राज्यात विविध कार्यक्रम सुरु केले आहे. 

एकीकडे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची निष्ठावंतांची यात्र सुरु आहे. काही ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली निर्धार मेळावे सुरु आहे. कल्याण पूर्व भागात आज शिवसेनेच्या निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा संपर्क प्रमुख अनित बिज्रे, लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर, महानगर प्रमुख विजय साळवी, शरद पाटील, चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, राजेंद्र चौधरी, हर्षवर्धन पालांडे आदि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. 

या मेळाव्या दरम्यान भाषण करताना साळवी यांनी एक किस्सा सांगितला. तो किस्सा ऐकून सर्व शिवसैनिक भावूक झाले. इतकेच नाही तर काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या बॅनरव उद्ध ठाकरे यांचे फोटो नव्हता. विजय साळवी यांचा फोटो वापरण्यात आला होता त्यावेळी साळवी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पष्ट सांगितले की, ज्या बॅनवर उद्धव ठाकरेंचा फोटो नसेल त्या बॅनरवर माझा फोटो वापरु नये. नव्या कार्यकारिणी संदर्भात मातोश्रीवर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी दिली आहे. या मेळाव्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याची सर्व शिवसैनिकांनी शपथ घेतली.

Web Title: Shiv Sena office bearer Vijay Salvi told a story at a Shiv Sena rally held in Kalyan.