खड्ड्यांत गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्डयात घालायची भाषा करू नये; मनसे आमदाराला शिवसेना नेत्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 04:15 PM2021-09-30T16:15:52+5:302021-09-30T16:16:48+5:30

रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी काल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी खड्डे बुजविले गेले नाही तर सत्ताधारी पक्ष, अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात घालू, असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिला होता.

Shiv Sena leader commented on MNS MLA Raju patil over Pothols | खड्ड्यांत गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्डयात घालायची भाषा करू नये; मनसे आमदाराला शिवसेना नेत्याचा टोला

खड्ड्यांत गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्डयात घालायची भाषा करू नये; मनसे आमदाराला शिवसेना नेत्याचा टोला

Next


कल्याण - कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाही. रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी काल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी खड्डे बुजविले गेले नाही तर सत्ताधारी पक्ष, अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात घालू, असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिला होता. यानंतर आता, शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी खड्ड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये, असा टोला मनसे पाटील यांना लगावला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने आली आहे. (Shiv Sena leader commented on MNS MLA Raju patil over Pothols)

शिवसेना माजी नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 2010 सालच्या निवडणूकीत मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. 2015 साली मनसेचे 9 नगरसेवक निवडून आले. त्यांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे मनसे हा खड्डय़ात गेलेला पक्ष आहे. त्याने कुणाला खड्ड्यात घालण्याची भाषा करु नये. मनसेचेही नगरसेवक महापालिकेत होते. त्यांनी का खड्डे प्रकरणी कधी आवाज उठविला नाही असा सवालही म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. 

 2014 साली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामावर 21 कोटी रुपये खर्च केले जात होते. त्यानंतर महापालिका हद्दीत काही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे करण्यात आले. त्यामुळे 2014 सालानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा खर्च कमी-कमी होत गेला. रस्ते विकासासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे 360 कोटीची रस्ते विकासाची कामे लवकर सुरु होणार आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्यावरील खर्च आणखीन कमी होऊ शकतो असा दावा म्हात्रे यांनी केला आहे.

Web Title: Shiv Sena leader commented on MNS MLA Raju patil over Pothols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.