शिवसेनेकडून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर; कल्याण लोकसभेतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तब्बल ७१३ बसेस होणार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 19:07 IST2025-08-24T19:06:14+5:302025-08-24T19:07:51+5:30

पहिल्या टप्प्यातील ४६५ बस आज रवाना. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत बस केल्या मार्गस्थ

Shiv Sena facilitates the travel of servants going to their villages for Ganeshotsav | शिवसेनेकडून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर; कल्याण लोकसभेतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तब्बल ७१३ बसेस होणार रवाना

शिवसेनेकडून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर; कल्याण लोकसभेतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तब्बल ७१३ बसेस होणार रवाना

कल्याण -शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यात आला आहे. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ७१३ मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. यापैकी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथून आज रवाना होणाऱ्या ४६५ बसगाड्यांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले. सर्व गणेशभक्तांनी यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. 

गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकण वासियांसाठी एक आनंदसोहळाच. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठया संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. याच पार्श्वभूमीवरी दरवर्षी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी, चिपळूण, लांजा, देवगड यांसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर याठिकाणी जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे ७०० ते ८०० बस कोकणात रवाना होत असतात.

राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेशभक्त जात असतात. या गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यंदा ७१३ मोफत बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून यासाठी मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली होती. यानुसार या सर्व बसगाड्या आज रविवार २४ ऑगस्ट आणि उद्या सोमवार २५ ऑगस्ट रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत. यासर्व गाडयांना खासदार डॉ.शिंदे हे भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करणार आहेत. यातील कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, उल्हासनगर तसेच अंबरनाथ येथील एकूण ४६५ गाड्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात आज रवाना झाल्या. यासाठी गणेशभक्तांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यामध्ये आज, २४ ऑगस्ट रोजी अंबरनाथ शहरातून ११, उल्हासनगर शहरातून ४, कल्याण पूर्वेतील १२०, कल्याण पश्चिमेतून १७ तर डोंबिवली शहर आणि डोंबिवली ग्रामीण येथून ३१० आणि मुंब्रा येथून ३ बसेस सोडण्यात आल्या.

तर उद्या २५ ऑगस्ट रोजी दिवा शहरातून ११७ आणि कळवा येथून १३१ बस सोडण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने दोन दिवसात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात ७१३ बस मोफत सोडण्यात येणार आहे.

Web Title: Shiv Sena facilitates the travel of servants going to their villages for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.