काय सांगता? राज्यातील 'या' ठिकाणी एक रुपयात मिळतंय एक लिटर पेट्रोल; पंपांवर भली मोठी रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 11:56 IST2021-06-13T11:55:37+5:302021-06-13T11:56:18+5:30

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल

Shiv Sena distributing petrol at Rs 1 per litre in Dombivli on Aditya Thackerays birthday | काय सांगता? राज्यातील 'या' ठिकाणी एक रुपयात मिळतंय एक लिटर पेट्रोल; पंपांवर भली मोठी रांग

काय सांगता? राज्यातील 'या' ठिकाणी एक रुपयात मिळतंय एक लिटर पेट्रोल; पंपांवर भली मोठी रांग

डोंबिवली-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली युवा सेनेतर्फे उस्मा पेट्रोल पंप येथे एक रुपयात एक लिटर पेट्रोल असा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी तरुणांची एकच रांग लागली होती.  

पेट्रोलचा दर आज एक लिटरला 102 रुपये असा होता एक रुपयात एक लिटर पेट्रोल मिळत असल्याने सगळ्यांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. पेट्रोल दरवाढीसाठी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. शिवसेनेकडून हा मुद्दा वारंवार मांडण्यात आला आहे. आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन शिवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारला चपराक देण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम युवा सेनेचे पदाधिकारी योगेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे आणि शहर प्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena distributing petrol at Rs 1 per litre in Dombivli on Aditya Thackerays birthday