शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी काढला कोंबडी मोर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:15 IST

Kalyan : शिवसैनिकांनी थेट तहसीलदार दीपक आकडे यांच्या दालनात जाऊन त्यांना राणे प्रकरणात सरकारला आमच्या भावना कळवा. या प्रकरणी पोलिसांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. 

कल्याण: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज कल्याण शिवसैनिकांनी कोंबडी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. राणे यांच्या पोस्टरला चपला मारुन त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुतळा जाळण्यापूर्वीच हिसकावून घेतला. 

शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवेसनेचे अरविंद मोरे, रविंद्र कपोते, महिला आघाडीच्या विजया पोटे यांच्यास युवा सेनेचे पदाधिकारी अभिषेक मोरे, योगेश निमसे, सुचेत डांबरे, सूरज खानविलकर, भूषण तरडे आदीनी राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. 

यावेळी राणे यांच्या फलकाला चपला मारण्यात आल्या. तसेच त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी शिवसैनिकांच्या हातातील पुतळा हिसकावून त्यांना पुतळा जाळण्यापासून मज्जाव केला.  यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या विरोधात हातात कोंबडय़ा घेऊन तहसील कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. 

पोलिसांनी त्यांना तहसील कार्यालयावर अडविण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी थेट तहसीलदार दीपक आकडे यांच्या दालनात जाऊन त्यांना राणे प्रकरणात सरकारला आमच्या भावना कळवा. या प्रकरणी पोलिसांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. 

यासंदर्भात आमदार भोईर यांनी सांगितले की, राणे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी यापूर्वीही मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेताल आणि चुकीची वक्तवे केली आहे. त्यांनी त्यांच्या जीभेला आवर घालावा. शिवसैनिकांचा संयम पाहू नका. शिवसैनिकांचा संयम सुटला तर तो  आवरता येणार नाही. राणे यांनी दादागिरीची भाषा करु नये. शिवसेनेत ही दादा आहेत.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेनाkalyanकल्याण