शिंदे सेनाही त्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी
By मुरलीधर भवार | Updated: February 18, 2025 21:14 IST2025-02-18T21:12:28+5:302025-02-18T21:14:02+5:30
"६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी शिंदे सेना पूर्ण ताकदीनिशी उभी..."

शिंदे सेनाही त्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी
डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ६५ बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनास दिले आहे. त्यामुळे रहिवासियांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची घरे वाचविण्यासाठी उद्धव सेना पुढे सरसावली असताना आज शिंदे सेनेेच उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी सांगितले की, ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी शिंदे सेना पूर्ण ताकदीनिशी उभी असल्याचे स्पष्ट केले आहे.
उपजिल्हा प्रमुख कदम यांनी सांगितले की, इमारतीमधील बाधित रहिवासीयांनी नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान खासदार शिंदे यांनी रहिवासियांना आश्वासन दिले आहे. न्यायालयाचे आदेश असले तरी त्यातून मध्यम मार्ग काढला जाईल. बाधित रहिवासियांना पूर्णपणे सर्वोतोपरी मदत केली जाईल. त्यांचा लढा सर्वोच्च न्यायालयात लढविला जाईल. त्यासाठी शिंदे सेेनेकडून चांगला अभ्यासू वकील सुद्धा देण्यात येणार आहे.
कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील विविध प्रकल्प बाधितांना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे यांच्या प्रयत्नातून बीएसयूपी योजनेतील घरे देण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात घेता ६५ बेकायदा इमारतीमधील रहीवासियांवर अन्याय होणार नाहीत. ते बेघर होणार नाही. यासाठी शिंदे सेना त्यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभी राहणार आहे.