कल्याणमध्ये शिंदे गटाचा जल्लोष, आमदार भोईर यांच्यासह समर्थकांना वाटले पेढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 05:51 IST2023-02-18T05:49:38+5:302023-02-18T05:51:05+5:30
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला

कल्याणमध्ये शिंदे गटाचा जल्लोष, आमदार भोईर यांच्यासह समर्थकांना वाटले पेढे
कल्याण - शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयाेगाने दिल्याने आज सायंकाळी शिंदे गटाकडून छत्रपती शिवाजी चाैकात कार्यकर्त्यांनी जल्लाेष साजरा केला. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भाेईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाके फाेडून जल्लाेष साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यभरातील शिंदे गटाच्या समर्तकांनी जल्लोष केला आहे. त्यातच, कल्याणमध्ये ढाेलताश्यांचा गजरात पेढे वाटण्यात आले. आमदार भाेईर यांनी आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी माजी नगरसेवक जयवंत भाेईर, प्रभूनाथ भाेईर, छाया वाघमारे, माेहन उगले आदी मान्यवर उपस्थित हाेते.