शशिकांत कांबळे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 17:24 IST2023-06-08T17:24:01+5:302023-06-08T17:24:10+5:30
डोंबिवली: भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष वाढीसाठी व २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणावर विजय मिळविण्यासाठी ...

शशिकांत कांबळे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
डोंबिवली: भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष वाढीसाठी व २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणावर विजय मिळविण्यासाठी ४८ लोकसभा व २८८ विधानसभेच्या निवडणूक प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे.
त्यानुसार कल्याण लोकसभा प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे तसेच डोंबिवली विधानसभा प्रज्ञेश प्रभुघाटे यांची निवड जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख पदी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पूर्व विधानसभा संजय मोरे, कल्याण ग्रामीण विधानसभा नंदू परब, अंबरनाथ विधानसभा गुलाबराव करंजुले पाटील, आदी पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. कल्याण जिल्ह्यातील नेत्यांकडे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारला निवडून आणण्यासाठी पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत, यामुळे कल्याण डोंबिवली शहरात उत्साहाचे वातावरण आहे.