कल्याणमधील न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत प्रदर्शन
By सचिन सागरे | Updated: August 24, 2023 17:56 IST2023-08-24T17:55:53+5:302023-08-24T17:56:16+5:30
या उपक्रमामध्ये इयत्ता ८वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

कल्याणमधील न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत प्रदर्शन
कल्याण: दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंना संस्कृतमध्ये काय म्हणतात याची शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी तसेच संस्कृत विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने पश्चिमेकडील ज.ए.ईच्या न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेत दरवर्षी ‘कालिदास दिन’ व ‘संस्कृत दिन’ साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये इयत्ता ८वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ह्या उपक्रमासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका निवेदिता कोरान्ने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेटकरी यांचे सहकार्य लाभले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज.ए.ईचे संचालक मंडळ सदस्य व शालेय समिती अध्यक्ष राधाकृष्ण पाठक यांनी केले. या प्रदर्शनाचा लाभ शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीतील २५० विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी घेतला.