संजय मित्रा... तुझं असं निघून जाणं मन अजूनही स्वीकारलं नाही : मंत्री रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Updated: May 22, 2024 20:59 IST2024-05-22T20:58:20+5:302024-05-22T20:59:17+5:30

देसले यांना भाजपची श्रद्धांजली

Sanjay Mitra... My mind still won't accept your departure like this: Minister Ravindra Chavan | संजय मित्रा... तुझं असं निघून जाणं मन अजूनही स्वीकारलं नाही : मंत्री रवींद्र चव्हाण

संजय मित्रा... तुझं असं निघून जाणं मन अजूनही स्वीकारलं नाही : मंत्री रवींद्र चव्हाण

डोंबिवली: संजय देसले हा माझ्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळापासून रिक्षा युनियनच्या माध्यमातून जोडला गेलेला माझा अत्यंत जवळचा मित्र आणि सहकारी होता. त्याचे गेल्या आठवड्यात निधन झाले, संजय मित्रा... तुझं असं निघून जाणं मन अजूनही स्वीकारल नाही असे भावनिक उद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. देसले हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि रिक्षा युनियनचे कार्यध्यक्ष होते. 

मंगळवारी डोंबिवलीत झालेल्या त्यांच्या श्रद्धांजली सभेला मंत्री चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले की, त्यांच्या आजवरच्या राजकीय, व्यक्तिगत जीवन प्रवासात देसले यांची साथ मोलाची होती. अशा मित्राच्या निधनाने वैयक्तिक जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली असून मन ते स्वीकारत नाही. यानिमित्ताने संजय सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी भाजपच्या वाहतुक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांच्यासह देसले कुटुंबिय, रिक्षा चालक उपस्थित होते.

Web Title: Sanjay Mitra... My mind still won't accept your departure like this: Minister Ravindra Chavan