कल्याणमध्ये आध्यात्म रत्न सन्मानाने संतांचा गौरव, वैदेही तामण यांच्या उपस्थित सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:13 IST2025-07-31T17:12:35+5:302025-07-31T17:13:24+5:30
कल्याणमधील महादेव मंदिरामध्ये आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संत आणि पुजाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला.

कल्याणमध्ये आध्यात्म रत्न सन्मानाने संतांचा गौरव, वैदेही तामण यांच्या उपस्थित सोहळा संपन्न
कल्याणमधीलकल्याणेश्वर महादेव मंदिरात माँ भगवती अखाडा आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. अलिकडेच झालेल्या या सोहळ्यात आध्यात्म रत्न पुरस्काराने संतांचा गौरव करण्यात आला. डॉ. वैदेही तामण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
या सन्मान सोहळ्यात सनातन धर्माची सेवा करणारे ब्राह्मण, पुजारी, गुरुकुल आचार्य, वेद विद्यार्थी, साधू-संत आणि मंदिर सेवक यांचा गौरव करण्यात आला. डॉ. तामण यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविले.
डॉ. तामण म्हणाल्या, “धर्मसेवा करणाऱ्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा गौरव. हा फक्त एक कार्यक्रम नाही तर एक समाज जागृतीचा प्रयत्न आहे.”
माँ भगवती अखाडा – महिलांसह धर्मसंवर्धनाची चळवळ
माँ भगवती अखाडा हे महिलांना धर्मात नेतृत्व देणारे आणि सनातन परंपरेला नवीन आयाम देणारे एक सशक्त व्यासपीठ असल्याचे तामण यांनी सांगितले.
कल्याणेश्वर महादेव मंदिर – भक्ती आणि सेवा यांचं केंद्र
हे मंदिर केवळ शिवपूजेचं स्थान नसून, येथे गुरुकुल, वेदपाठ, ध्यान आणि सामाजिक उपक्रम नियमित राबवले जातात. भक्ती आणि साधनेसाठी येणाऱ्या शेकडो भाविकांना या आश्रमाने मार्गदर्शन दिलं आहे.
वेद आरोग्यम – आरोग्य आणि वेदांचा संगम
वेद आरोग्यम हे आयुर्वेद आणि वेदाधिष्ठित आरोग्य सेवा केंद्र आहे. येथे नैसर्गिक उपचार, पंचकर्म, आयुर्वेदिक औषधनिर्माण आणि योग प्रशिक्षण दिले जाते. या केंद्राच्या माध्यमातून शेकडो लोकांना नवजीवन मिळाले आहे.