Routine surgery should be postponed to make oxygen available to the corona patient | कोरोना रुग्णाला ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी रुटीन सजर्री पुढे ढकल्याव्यात

कोरोना रुग्णाला ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी रुटीन सजर्री पुढे ढकल्याव्यात

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णलयात ऑक्सीजन कमी पडतो. खाजगी रुग्णालयांनी टाळता येण्यासारख्या रुटीन सजर्री टाळून पुढे ढकलल्यास त्या सजर्रीसाठी लागणारा ऑक्सीजन कोविड रुग्णांकरीता वापता येऊ शकतो अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खाजगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांना केली आहे.


राज्याच्या टास्क फोर्सने ज्या कोरोना रोखण्यासाठी ज्या काही महत्वाच्या सूचना केल्या आहे. त्यासंदर्भात आज महापालिका आयुक्तांनी खाजकी कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांशी वेबीनॉरद्वारे संवाद साधला. हा संवाद साधल्यानंतर उपरोक्त सूचना केल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. आयुक्तांनी सांगितले की, महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ४५ मेट्रीक टन ऑक्सीजन लागतो. महापालिकेची रुग्णालये धरुन खाजगी कोविड रुग्णालयांना १२८ मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज आहे. अनेक खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा करणारे पुरवठादार हे लहान स्वरुपाचे आहे. त्यांना मोठय़ा स्वरुपाच्या पुरवठादारांकडून ऑक्सीजनचा पुरवठा केला जावा यासाठी महापालिका प्रसासन प्रयत्नशील आहे.

ऑक्सीजन कमी पडू दिला जाणार नाही यासाठी महापालिकेकडून सवरेतोपरी प्रयत्न सुरु आहेत. रेमडेसीवीर हे इंजेक्सन रुग्णांसाठी लाईफ सेव्हर नाही. हे इंजेक्शन रुग्णाला २ ते ९ या दिवसात दिले गेले पाहिजे. काही डॉक्टर हे इंजेक्शन दहा दिवस देत आहेत. पर्यायी औषधेही रुग्णाचा जीव वाचवू शकतात. त्याचा वापर खाजगी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी करण्याची गरज आहे. काही रुग्ण चार पाच दिवस ताप अंगावरु काढून मग कोरोना टेस्ट करतात. रुग्णांनी असे न करता टेस्ट केली पाहिजे. रुग्णालया ऐवजी घरी उपचार घेत असल्याने रुग्णाने दर चार तासाने ताप किती आहे हे तपासले पाहिजे. सहा मिनिटे चालण्याची टेस्ट केली पाहिजे. त्याचबरोबर प्लाङमा हा २ ते ४ दिवसात दिला गेल्यास रुग्णाला उपयुक्त ठरु शकतो. मात्र अनेक रुग्ण हे चार दिवसांनी रुग्णालयात येतात याकडे टास्क फोर्सने लक्ष वेधले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

Web Title: Routine surgery should be postponed to make oxygen available to the corona patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.