कल्याणमध्ये ज्वेलर्स दुकानात भरदिवसा तिघा चोरट्यांकडून लूट; एकाला पकडण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 23:26 IST2020-11-16T23:26:33+5:302020-11-16T23:26:52+5:30
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; दोघा चोरट्यांचा शोध सुरू

कल्याणमध्ये ज्वेलर्स दुकानात भरदिवसा तिघा चोरट्यांकडून लूट; एकाला पकडण्यात यश
कल्याणः येथील पूर्वेकडील नांदिवली परिसरातील वैष्णवी ज्वेलर्सच्या दुकानात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तिघा चोरट्यांनी शस्त्राच्या धाकाने लूट केल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी धारधार शस्त्राने ज्वेलर्स दुकानातील कर्मचाऱ्याला जखमी केले. मात्र त्या जखमी झालेल्या कर्मचाऱ्याने धाडस दाखवत तिघांपैकी एका चोरट्याला पकडले. तर दोन चोरटे 30 तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड घेऊन पसार झाले आहेत.
कल्याणमधील ज्वेलर्स दुकानात भरदिवसा तिघा चोरट्यांकडून लूट; घटना सीसीटीव्हीत कैद https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/GK25kcBYuR
— Lokmat (@MiLOKMAT) November 16, 2020
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पकडण्यात आलेल्या चोरट्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान ही लुटमारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून लुटारुंकडे रिव्हॉल्वर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेचा कोळसेवाडी पोलीस तपास करीत आहेत.