शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

 एमआयडीसीतील रस्ते विकासाचा मार्ग झाला माेकळा; खासदारांनी केला होता पाठपुरावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 1:08 AM

एमआयडीसीतील रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी १९८९ मध्ये केडीएमसीला हस्तांतरित करण्यात आले होते.

कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांच्या विकासासाठी ५७ कोटी ३७ लाख रुपयांचे अनुदान एमएमआरडीएने कल्याण-डोंबिवली मनपास वितरित करावे, असे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना दिले आहेत. या कामांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे तेथील रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

एमआयडीसीतील रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी १९८९ मध्ये केडीएमसीला हस्तांतरित करण्यात आले होते. औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची लांबी २१ किमी तर निवासी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी १३ किमी आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने रस्त्यांवर पाणी साचत होते. रस्ते खराब झाले होते. ही बाब डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. रस्ते दुरुस्ती-देखभालीसाठी एमआयडीसी आणि मनपाने ५०-५० टक्के खर्च करण्यास सहमती दर्शविली होती.

५७ कोटी ३७ लाख रुपये देण्याचे आदेशऔद्योगिक आणि निवासी भागासाठी एकूण ११० कोटी ३० लाख रुपये खर्चाचा ढोबळ प्रस्ताव तयार केला होता. कोविडकाळात मनपावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना मोठा ताण होता. त्यामुळे निधी प्राप्त व्हावा, यासाठी डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. या रस्त्यासाठीचा ५० टक्के म्हणजे ५७ कोटी ३७ लाख रुपये मनपास द्यावेत, असे आदेश नगरविकासमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले आहेत. तर, उर्वरित ५० टक्के खर्च एमआयडीसीकडून केला जाणार आहे. दरम्यान, ५० टक्के निधी मनपातर्फे एमएमआरडीए देत असल्याने रस्ते विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीShrikant Shindeश्रीकांत शिंदेroad transportरस्ते वाहतूक