शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

डासांच्या झुंडीने एमआयडीसीचे रहिवासी त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By अनिकेत घमंडी | Updated: February 27, 2024 12:06 IST

एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत.

डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या कित्येक महिन्यात निवासी परिसरात कीटक नाशक फवारणी/धुरिकरण झालेली नाही. महापालिका करतेय काय? असा सवाल रहिवाश्यांनी केला. उघड्या पावसाळी गटारातून सांडपाणी वाहत असल्याने डासांच्या उत्पतीत वाढ होऊन त्यांच्या झुंडी घरात प्रवेश करून नागरिकांना चावत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केडीएमसीकडे तक्रार करूनही काही त्याची दखल घेतली जात नाही अशी टीका दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केली.

जे तक्रारदार पाठपुरावा करतात त्या रहिवाशांचा इमारती पुरते फवारणी केली जाते. तरीही डासांचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून डासांपासून निर्माण होणारे संसर्ग नागरिकांना होऊन आजार झाल्यास त्यास जबाबदार कोण?असा सवाल नलावडे यांनी केला. जो पर्यंत उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून सांडपाणी वाहण्याचे बंद होत नाही तोपर्यंत हा डासांचा त्रास कमी होणार नाही. डास पैदास होण्याचे हे मुख्य कारण असून हे सांडपाणी बंदिस्त भूमिगत वाहिन्यांमधून न जाता उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून जाण्यापासून रोखले गेले पाहिजे. एमआयडीसी निवासी मधील भूमिगत सांडपाणी वाहिन्या या जुन्या झाल्याने ठिकठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. आता एमआयडीसी कडून नवीन सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम चालू असून ते काम पूर्ण होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत केडीएमसीने दिवसाआड चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी/धुरीकरण करणे हा एकमेव उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांना अपेक्षित आहे. कोरोना काळात काही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांनी कमी दर्जाची कीटकनाशक फवारणी करून आणि त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकून श्रेय घेतले होते ते आता कुठे गेले असा सवाल नागरिकांनी केला. आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांनी चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी केडीएमसी कडून करून घ्यावी किंवा स्वखर्चाने करून मतदारांना दिलासा द्यावा असेही नलावडे म्हणाले.