रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरण: गोकुळचा ताबा पोलिसांकडेच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:26 IST2025-07-26T09:26:15+5:302025-07-26T09:26:52+5:30

रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Receptionist assault case: Gokul in police custody, remanded in judicial custody for 14 days | रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरण: गोकुळचा ताबा पोलिसांकडेच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरण: गोकुळचा ताबा पोलिसांकडेच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याण : रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत यांना शुक्रवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी रंजीत याने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर न्यायालयाने पोलिस, सरकारी वकिलांचे मत मागितले आहे. 

रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात गोकुळ आणि त्याचा भाऊ रंजीत यांच्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. गोकुळ हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली. आडिवली-ढोकळी भागात बिल्डिंगमध्ये पाणी सोडण्याचे काम करणाऱ्यावर गोकुळ आणि त्याच्या साथीदारांनी धारदार हत्याराने हल्ला केला होता. या गुन्ह्यात गोकुळ फरार होता. या प्रकरणात पाेलिसांनी त्याचा ताबा न्यायालयाकडून घेतला. गोकुळला शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे,

तपास अधिकारी बदलण्यासाठी अर्ज
पोलिसांच्या तपासावर पीडितेचे वकील ॲड. हरीष नायर यांनी नाराजी व्यक्त केली असून, या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्याची मागणी पीडितेने पोलिस उपायुक्तांकडे केली.

मुजोर आरोपीची पत्रकारांना धमकी
गोकुळने बुधवारी न्यायालयात अरेरावी केली होती. शुक्रवारीही त्याची मुजोरी पाहायला मिळाली. त्याला मानपाडा पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेताना त्याने बेड्या घालण्यास नकार दिला. तसेच, चेहऱ्यावर फडके गुंडाळण्यास मनाई करत पोलिसांशी वाद घातला. कोठडीतून बाहेर आल्यावर त्याने स्थानिक पत्रकारांना ‘तुम्ही चुकीचे केलेय, आपली लवकरच भेट होईल,’ अशी धमकीही दिली.

Web Title: Receptionist assault case: Gokul in police custody, remanded in judicial custody for 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.