शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सामान्य प्रवाशांसाठी सुरु झाली रेल्वे सेवा; महिलांनी पेढे वाटून साजरा केला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:38 IST

कामकाजाशी न जुळणारे वेळापत्रक बदलण्याची मागणी

कल्याण-कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे लोकल सेवा आज सामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. दहा महिन्यानंतर सुरु करण्यात आलेल्या लोकलसेवेचे आनंद महिला वर्गाने पेढे वाटून साजरा केला. मात्र रेल्वेने सामान्य प्रवाशांकरीता दिलेले वेळापत्रक हे त्यांच्या कामकाजाशी न जुळणारे आहे. वेळापत्रकात बदल व्हावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांनी नियम मोडू आणि गर्दी होऊ नये याकरीता रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज तीन ते चार लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आज सर्व सामान्यांकरीता प्रवास खुला करण्यात आला. आज पहाटे ४.४१ वाजता कल्याण रेल्वे स्थानकातून पहिली लोकल गाडी सामान्य प्रवाशाकरीता सोडण्यात आली. गाडीला पहाटेची पहिली गाडी असल्याने गाडीला फारशी गर्दी नव्हती. मात्र प्रवासी सोशल डिस्टसिंग ठेवून गाडीत प्रवासाकरीता बसलेले दिसून आले. सामान्य प्रवाशांकरीता पहाटे ते सकाळी ७ वाजेर्पयत, दुपारी १२ ते ४ वाजेर्पयत आणि रात्री ९ वाजल्यानंतर प्रवास करता येणार आहे. मात्र ज्या चाकरमान्याची डय़ूटी १० वाजताची आहे. त्याला पहाटे सहा वाजताची गाडी पकडून मुंबई गाठावी लागणार आहे. कामाच्या दोन तास आधीच मुंबईत प्रवासी दाखल होईल.

तसेच कामावरुन तो सहा वाजता सुटल्यावर दोन तास त्याला मुंबईत थांबून त्यानंतर त्याला ९ वाजताची गाडी पकडावी लागेल. त्यामुळे पहाटे लवकर उठून रात्री उशिरा १२ वाजता घरी पोहचावे लागेल. एकीकडे गाडय़ा सुरु झाल्या त्याचा आनंद प्रवासी वर्गात होता. मात्र वेळापत्रक जूळून येत नसल्याने ते गैरसोयीचे आहे. दुसरीकडे दररोज रस्ते प्रवासीने वाहतूक कोंडीचा सामना करीत जास्तीचे प्रवास भाडे देत प्रवास करावा लागत होता. आत्ता रेल्वे सुरु झाल्याने वेळ आणि पैसा वाचणार अशीही प्रतिक्रिया प्रवासी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली. ७ वाजेर्पयत तिकीट खिडकीवर तिकीट देणो बंधनकारक होते. मात्र ७ नंतरही प्रवाशांना तिकीट दिले जात होते. त्याविषयी तिकीट खिडकीवर विचारणा केली असता प्रवासांची गैरसोय होऊ नये यासाठी तिकीट दिले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र स्थानकातील एव्हीएम मशीनद्वारे तिकीट देण्याची सेवा बंद करण्यात आली होती.

कल्याण रेल्वे पोलिसांची हद्द ८४ किलोमीटर र्पयतची आहे. या  हद्दीत अंतर्गत येणा:या प्रत्येक रेल्वे स्थानकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कल्याण ते बदलापूर, कल्याण ते कसारा दरम्यान पोलिस बंदोबस्त आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे यावर पोलिस नजर ठेवून आहेत. त्यासाठी १९० पोलिस व १५ पोलिस अधिकारी कार्यरत आहेत. प्रवाशांनी नियमांचे पालन करुन प्रवास करावा असे आवाह पोलिस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे