उल्हासनगरात जुगार अड्ड्यावर धाड, १६ जणावर गुन्हे
By सदानंद नाईक | Updated: November 27, 2024 18:08 IST2024-11-27T18:07:28+5:302024-11-27T18:08:07+5:30
या धाडसत्राने शहरांत जुगार राजरोसपणे सुरु असल्याचे उघड झाले आहे.

उल्हासनगरात जुगार अड्ड्यावर धाड, १६ जणावर गुन्हे
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, ओटी सेकशन येथील पिंटो हॉटेल मागील जुगार अड्ड्यावर कल्याण गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी ४ वाजता धाड टाकून तब्बल १६ जणांना अटक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या धाडसत्राने शहरांत जुगार राजरोसपणे सुरु असल्याचे उघड झाले आहे.
उल्हासनगरातील विविध भागात मटका जुगार, तीन पाने जुगार अड्डे सुरु असून अनेक लॉज मध्येही अनैतिक धंदे सुरु आहेत. मंगळवारी दुपारी ४ वाजता कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कॅम्प नं-३, पिंटो हॉटेल मागील जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल १६ जणांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५ प्रमाणे गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यासह २४ हजार १५० रुपये हस्तगत केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत. गेल्या महिन्यात कॅम्प नं-३, शांतीनगर येथील एका लॉजवर शहराबाहेरील पोलिसांनी धाड टाकून अनैतिक धंदा करणाऱ्या थायलंड मुलीसह मोरक्याला अटक केली होती. याप्रकाराने स्थानिक पोलीस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. शहर पोलिसांनी शहरांतर्गत सुरु असलेल्या. अनैतिक धंद्यासह जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.