शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली : सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढण्याची तयारी करा; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचाही स्वबळाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 19:42 IST

रविवारी पार पडलेल्या बैठकीत देण्यात आले निर्देश. वरिष्ठांचा निर्णय येण्याची वाट पाहू नका स्वबळावर केडीएमसी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेण्याच्या सूचना.

ठळक मुद्देवरिष्ठांचा निर्णय येण्याची वाट पाहू नका स्वबळावर केडीएमसी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेण्याच्या सूचना.

डोंबिवली:  काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या बैठकीनंतर केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीनेही आता स्वबळाचा नारा दिला आहे. मनपाच्या सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रविवारी केले.

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहेत. रविवारी कल्याण पश्चिमेतील रामदासवाडीत पार पडलेल्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी नुकतीच जिल्हा निरिक्षकपदी नियुक्त झालेले स्थानिक नेते प्रमोद हिंदूराव देखील उपस्थित होते. मार्गदर्शन करताना शिंदे यांनी शहरातील स्थानिक समस्यांवरही प्रहार केला. आजही बीएसयुपीतील घरे नागरीकांना मिळालेली नाहीत. त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. अनेक भागांमध्ये स्वच्छता होत नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे याकडे लक्ष वेधले. सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढविण्याची आपली तयारी सुरू आहे त्यादृष्टीने प्रभागांमध्ये मेळावे घेतले जात आहेत. वरिष्ठांचा निणर्य येण्याची वाट पाहू नका स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेवा असे शिंदे यावेळी  म्हणाले.

"शिवसेनेने ठेका घेतला आहे का"आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. परंतु विकासकामांचे बोर्ड कोणाचे लागतात ते फक्त शिवसेनेचे. शिवसेनेने काय ठेका घेतला आहे का? आपण त्यांना हे का करून द्यावे. विकास कामांच्या बाबतीत स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करून आपण सांगितले पाहिजे. आपली कामे निदर्शनास आणून ती करून घेतली पाहिजेत, आपण केलेल्या विकासकामांचे बॅनर शहरभर लागले गेले पाहिजेत असे मत प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोले