कल्याण - कोरोना महामारीच्या संकटातून नागरीक सावरत असताना घरा घरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी मात्र सामाजिक बांधिलकी जपत अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करुन त्यांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविला आहे. कल्याण पडघा रोडवली मैत्रकूल अनाथ मुलांचे वस्तीगृह आहे. या वस्तीगृहातील 19 अनाथ मुलांना दिवाळीच्या फराळासह दहा दिवस पुरेल इतके रेशन दिले आहे. या वेळी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार व सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रीतम चौधरी यांच्या हस्ते ही मदत दिली देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अशीष गायकवाड यांनी पोलिसांचे आभार मानले.
पोलिसांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 16:02 IST