शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

विशाल गवळीचा आठ गुन्ह्यांतील जामीन रद्द करण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 08:19 IST

कायदेतज्ज्ञ साशंक; फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी काेठडीत आहे. त्याच्याविरोधात २०१४ सालापासून दाखल गंभीर गुन्ह्यांत त्याला जामीन झाल्याने अधिक गंभीर गुन्हे करण्याची त्याची हिंमत वाढली. आधीच्या गुन्ह्यातील मंजूर झालेले जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

कायदेतज्ज्ञांनी सांगितले की, अशा प्रकारे जामीन रद्द करण्याची तरतूद नाही. एखाद्या आरोपीला कोणत्या मुद्द्याच्या आधारे जामीन मंजूर झाला, हे  पाहावे लागेल. जामिनावर सुटून आरोपी हा त्याने केलेल्या गुन्ह्यातील पीडिताला साक्षीदाराला पुन्हा त्रास देत असेल, तर पीडित आणि साक्षीदार तक्रार करू शकतात. आरोपीचा जामीन न्यायालयाकडून रद्द केला जाऊ शकतो.  मागच्या गंभीर गुन्ह्यातील जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तपास यंत्रणेने आता घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात तपास करून सबळ पुरावे न्यायालयात सादर करावे. हे प्रकरण आणि मागील आठ गुन्ह्यांतील प्रकरणे ही जलदगती न्यायालयात चालवणे अपेक्षित आहे. मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याने फाशीची शिक्षा होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

जामीन मिळत गेल्याने भय संपले -  गवळीवर २०१४ सालापासून गेल्या दहा वर्षांत आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. -  त्यामध्ये मुलींचा विनयभंग, मुलाच्या सोबत अनैसर्गिक लैगिंक अत्याचार, चोरी, खुनाचा प्रयत्न, तडिपारीचे आदेश भंग करणे याचा समावेश आहे. -  या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला. त्याला जामीन मिळत गेल्याने भय राहिले नाही. त्याची हिंमत वाढली. त्याला या आधीच्या गुन्ह्यात मिळालेले जामीन रद्द करण्याची मागणी पोलिस न्यायालयाकडे करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkalyanकल्याण