तरूणावर शस्त्राने हल्ला करणारा गजाआड
By प्रशांत माने | Updated: April 27, 2023 18:36 IST2023-04-27T18:34:08+5:302023-04-27T18:36:00+5:30
या गुन्हयातील आरोपीला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

तरूणावर शस्त्राने हल्ला करणारा गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: शहरातील पूर्व भागातील कचोरे पाईपलाईन रोडवरील बीएसयुपी प्रकल्पाच्या ठिकाणी एका तरूणाने दुस-या तरूणावर शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. या हल्ल्यात साजिद शेख हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. या गुन्हयातील आरोपीला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. शहबाज मनसब पठाण उर्फ खब्या असे अटक आरोपीचे नाव आहे.
आरोपी खब्या आणि हल्यात गंभीर जखमी झालेला साजिद हे दोघेही कचोरे, न्यू गोविंदवाडी परिसरातील राहणारे आहेत. साजिदच्या गळयावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"