कल्याण -शिळ रोडवर पुन्हा पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 16:55 IST2021-10-09T16:54:35+5:302021-10-09T16:55:37+5:30
देसाई गावाजवळ आणि खिडकाळेश्वर मंदिर अशा दोन ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे.

कल्याण -शिळ रोडवर पुन्हा पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
कल्याण- गेल्या काही दिवसांपासून कल्याण शीळ रोड परिसरात वारंवार एमआयडीसीच्या पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळी वाजण्याच्या सुमारास पुन्हा जलवाहिनी फुटली आहे. साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती स्थानीकांनी दिली आहे.
देसाई गावाजवळ आणि खिडकाळेश्वर मंदिर अशा दोन ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. ज्याठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे त्या परिसरात अक्षरशः पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. कल्याण शीळ रस्ता संपूर्णपणे जलमय झाला होता. काही घरांमध्ये सुद्धा हे पाणी शिरलं होतं. पाण्यातुनच वाहनांना वाट काढावी लागली.रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झाल्यानं वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना धावपळ करावी लागली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून. एमआयडीसीच्या कारभारावर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली