धक्कादायक! कल्याणमध्ये पानटपरी चालकाला मारहाण करून लुटले
By मुरलीधर भवार | Updated: December 7, 2023 17:22 IST2023-12-07T17:21:16+5:302023-12-07T17:22:34+5:30
या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! कल्याणमध्ये पानटपरी चालकाला मारहाण करून लुटले
मुरलीधर भवार, कल्याण : शहराच्या पूर्व भागातील साकेत कॉलेज परिसरात असलेल्या पानटपरी चालकासह त्याच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्याकडील २ हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन चाैरसिया हा टपरीचालक चिंचपाडा परिसरात राहतो. त्याची पानटपरी साकेत कॉलेजजवळ आहे. त्याच्या टपरीवर काही जण आले. दुकान बंद कर असे धमकाविले. त्याच्या अंगावर कोयता उगारुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांनी त्याच्या दुकानातील दोन हजार रुपये लुटले.
त्याने प्रतिकार केला असता त्याच्यासह त्याच्या वडिलांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी गुड्डा, बाबू गायकवाड आणि अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.