पद्मश्री गजानन माने यांचे जल्लोषात स्वागत, कुष्ठरुग्णांना समर्पित केला पुरस्कार

By प्रशांत माने | Updated: April 9, 2023 18:40 IST2023-04-09T18:40:46+5:302023-04-09T18:40:57+5:30

राष्ट्रपती भवन दरबार हॉलमध्ये प्रदान करण्यात आला.

Padma Shri Gajanan Mane received in a rousing ceremony, award dedicated to leprosy patients | पद्मश्री गजानन माने यांचे जल्लोषात स्वागत, कुष्ठरुग्णांना समर्पित केला पुरस्कार

पद्मश्री गजानन माने यांचे जल्लोषात स्वागत, कुष्ठरुग्णांना समर्पित केला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवलीः कुष्ठमित्र गजानन माने यांना कुष्ठरुग्णांच्या सेवेबद्दल जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथील राष्ट्रपती भवन दरबार हॉलमध्ये प्रदान करण्यात आला.

माने यांना बहाल केलेल्या पुरस्काराबद्दल डोंबिवली पूर्व कचोरे येथील हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीत आज  कुष्ठरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. माने वसाहतीमध्ये येताच कुष्ठरुग्णांनी पेढा भरवून त्यांचे कौतुक केले. पद्मश्री पुरस्काराचे मिळालेले 'पदक' माने यांच्याकडून कुष्ठरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दाखविण्यात आले.

माने यांनी यावेळी कुष्ठरुग्णांशी संवाद साधला या पद्मश्री पुरस्काराचे खरे मानकरी तुम्ही आहात, तुमच्या मुळेच हा मान मला मिळाला आहे अशा शब्दात भावना व्यक्त करताना हा पुरस्कार तुम्हाला समर्पित करीत असल्याचे माने यावेळी म्हणाले.

Web Title: Padma Shri Gajanan Mane received in a rousing ceremony, award dedicated to leprosy patients