लोक अदालतीतून प्रलंबित १ लाख ६७ हजार प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

By अनिकेत घमंडी | Updated: September 6, 2023 16:21 IST2023-09-06T16:20:47+5:302023-09-06T16:21:25+5:30

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित होणार आहे.

Opportunity for electricity consumers to settle 1 lakh 67 thousand pending cases from Lok Adalat | लोक अदालतीतून प्रलंबित १ लाख ६७ हजार प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

लोक अदालतीतून प्रलंबित १ लाख ६७ हजार प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

डोंबिवली: कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुका न्यायालय स्तरावर शनिवारी आयोजित लोक अदालतीत सहभागी व्हावे लागेल. अशा १ लाख ६७ हजार ग्राहकांना नोटीस बजवण्यात आली असून सतर्क करण्यात आले आहे.

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित होणार आहे. परिमंडलातील संबंधित ग्राहकांना सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटिस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येईल. संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Web Title: Opportunity for electricity consumers to settle 1 lakh 67 thousand pending cases from Lok Adalat