लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

By अनिकेत घमंडी | Updated: December 7, 2023 16:45 IST2023-12-07T16:44:34+5:302023-12-07T16:45:21+5:30

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात ०९ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

Opportunity for electricity consumers to dispose of pending cases through Lok Adalat | लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

डोंबिवली: कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुका न्यायालय स्तरावर शनिवारी (०९ डिसेंबर) आयोजित लोक अदालतीत सहभागी व्हावे लागेल.

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात ०९ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. परिमंडलातील सुमारे १ लाख ५४ हजार ग्राहकांना २३० कोटी रुपयांच्या थकीत वसुलीसाठी लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

नोटिस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येईल. संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
 

Web Title: Opportunity for electricity consumers to dispose of pending cases through Lok Adalat