जन्म मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन; केडीएमसी मुख्यालयात नोंदणीसाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 17:21 IST2021-05-24T17:20:21+5:302021-05-24T17:21:28+5:30
कल्याण-जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रस नोंदणी करणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. तासंतास नागरीकांना रांगेत ताटळत उभे राहवे लागत आहे.

जन्म मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन; केडीएमसी मुख्यालयात नोंदणीसाठी गर्दी
कल्याण-जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रस नोंदणी करणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. तासंतास नागरीकांना रांगेत ताटळत उभे राहवे लागत आहे. गेल्या तीन दिवसापासून हा त्रस सहन करावा लागत असल्याची तक्रार रांगेत उभ्या असलेल्या नागरीकांनी केली आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या नागरीकांकडून मृत्यू दाखले काढण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली जाते. कोविड काळात अऩेकांचे आर्थिक दावे असतात त्याच्या पूर्ततेसाठी तातडीने मृत्यू दाखल्याची आवश्यकता असते. त्याशिवाय पुढील प्रकरणो हलत नाही. नागरीकांनी आज सोमवारी महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात रांग लावली होती. त्याठिकाणी सव्र्हर डाऊन असल्याने ऑनलाईन नोंदणी होत नसल्याचे कारण सांगण्यात आहे. ही साईट गेल्या तीन दिवसापासून बंद आहे. एका नागरीकाने सांगितले. गेल्या तीन दिवसापासून ऑनलाईन मृत्यू दाखल्याच्या नोंदणीकरीता ते महापालिकेत हेलपाटे मारत आहेत. एका ज्येष्ठ नागरीकाच्या मते आम्ही किती वेळ रांगेत उभे राहयचे. त्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसापासून साईट बंद आहे. सर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या आहे. त्याची पाटी नागरी सुविधा केंद्रात लावली आहे. याविषयी सरकारकडे तक्रार केली आहे. साईट सुरु झाल्यावर नोंदणी सुरळित होईल.