बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सामाजिक संस्थेला एक लाखाची मदत

By मुरलीधर भवार | Updated: December 24, 2022 13:48 IST2022-12-24T13:47:48+5:302022-12-24T13:48:01+5:30

कल्याण पश्चिमेतील बापगाव येथील चिंरजीवी आणि मैत्रकूल ही संस्था अनाथ आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी कार्यत आहे.

One lakh aid from Balasaheb's Shiv Sena to a social organization | बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सामाजिक संस्थेला एक लाखाची मदत

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सामाजिक संस्थेला एक लाखाची मदत

कल्याण- बचपन बचाओ, मानवता बचाओ या उद्देशाने कार्यरत असलेल्या चिरंजीवी आणि मैत्रकूल या सामाजिक संस्थेला इमारत निधीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. 

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण पूर्व भागाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी ही मदत केली आहे. कल्याण पश्चिमेतील बापगाव येथील चिंरजीवी आणि मैत्रकूल ही संस्था अनाथ आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी कार्यत आहे. या संस्थेच्या सदस्या सलोनी तोडकर या उपोषण करीत आहेत. सामाजिक सुधारणा, मुलांचे शिक्षण या विविध विषयावर ही संस्था कार्यरत आहे. गेल्या चार महिन्यापासून या संस्थेच्या वतीने अनाथ आणि गरजू मुलांसाठी इमारत उभारण्यासाठी शिक्षण वारी सुरु आहे. त्यासाठी सलोनी तोडकर यांनी पुन्हा तीन दिवसांचे उपोषण सुरु केले आहे. या संस्थेला गायकवाड हे जमेल तशी मदत करीत असतात. मात्र आज पुन्हा त्यांना ही बाब कळताच त्यांनी बापगाव येथील संस्थेत धाव घेतली. तोडकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देत एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला

Web Title: One lakh aid from Balasaheb's Shiv Sena to a social organization