डोंबिवली MIDC मध्ये कंपनीत एकाचा स्फोटात तर दुसऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू!

By सचिन सागरे | Published: March 15, 2024 07:01 PM2024-03-15T19:01:21+5:302024-03-15T19:01:41+5:30

MIDC परिसरातील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही

One died in an explosion and another due to heat in a company in Dombivli MIDC | डोंबिवली MIDC मध्ये कंपनीत एकाचा स्फोटात तर दुसऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू!

डोंबिवली MIDC मध्ये कंपनीत एकाचा स्फोटात तर दुसऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू!

सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: येथील एमआयडीसी परिसरातील दोन विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका कंपनीत केमिकलचा स्फोट झाल्याने संतोष खांबे (४७) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसऱ्या कंपनीत उष्णतेचा त्रास झाल्याने पवन सिंग या कामगाराला आपला जीव गमवावा लागला. मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

एमआयडीसी फेज-१ मध्ये कॅलेक्सी केमिकल्स अँड फार्मासिटिकल (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) कंपनी आहे. या कंपनीत औषध बनविण्याचे काम केले जाते. दुपारी १२.४५ च्या सुमारास कंपनीतील ड्रममध्ये असलेले केमिकल काढण्याचे काम सुरु होते. याच दरम्यान केमिकलचा स्फोट झाल्याने खांबे यांचा मृत्यू झाला. केडीएमसीच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात ही आग आटोक्यात आणली.

तर, दुसरी घटना कल्याण शिळ रोडवरील श्रीजी लाइफस्टाइल कंपनीत घडली. या कंपनीत तयार झालेल्या उष्णतेचा त्रास झाल्याने पवन या कामगाराला उलट्या झाल्या. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा पवनच्या नातेवाईकांनी दिला. एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली.

Web Title: One died in an explosion and another due to heat in a company in Dombivli MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.